काँग्रेसच्या स्वार्थामुळे शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही :- पंतप्रधान मोदी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही,असं पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलंय.
तसंच एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी यावेळी दाखला दिला. मोदींच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांची पंतप्रधानपदाची संधी का हुकली याची पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाली,
शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पन्नास वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद आणि कृषी मंत्रीपदही भूषवलं. मात्र शरद पवारांचं पंतप्रधान होण्याची संधी हुकली. पंतप्रधान होण्यासाठी शरद पवारांनी ठाम भूमिका न घेतल्याने संधी हुकल्याची खंत प्रफुल्ल पटेल यांनी देखील माझा कट्ट्यावर ही खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर आता मोदींनी पुन्हा शरद पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या संधीवर वक्तव्य केले आहे.
वैयक्तिक स्वार्थासाठी काँग्रेसने अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं
काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असे मोदी म्हणाले. या अगोदर प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवारांचे पंतप्रधान पद काँग्रेसमुळे हुकल्याची प्रतिक्रिया दिली होती.
शरद पवारांना पंतप्रधानपदाने हुलकावणी कशी दिली याची आठवण सांगताना प्रफुल्ल पटेल म्हणाले माझा कट्ट्यावर म्हणाले होती की, काँग्रेसचे नेते नरसिंह राव यांना शरद पवारांना पुढे येऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचे 145 खासदार असतानादेखील त्यांनी देवेगौडा यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला. पण त्यानंतर सिताराम केसरी यांना पंतप्रधान व्हायचं होतं म्हणून त्यांनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. शरद पवार त्यावेळी काँग्रेसचे संसदीय नेते होते. त्यानंतर सर्वच खासदारांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. खुद्द देवेगौडा यांनीही शरद पवारांनी नेतृत्व स्वीकारावं आणि पंतप्रधान बनावं अशी इच्छा व्यक्त केली. पण शरद पवारांनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली नाही, आमचं गणित चुकलं आणि इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान झाले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….