विदर्भ राज्य आंदोलन समिती चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा, विदर्भ आणि वीज दराबाबत आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन केलं.
नागपुरात विदर्भवादी आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर यांच्या घराबाहेर विदर्भवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फडणवीस यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विदर्भावादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं येथे पाहायला मिळत आहे.
फडणवीसांच्या घराबाहेर विदर्भवाद्यांचा मोर्चा
विदर्भवादी आंदोलकांना वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरात अडवण्यात आलं आहे. संविधान चौकापासून आंदोलकांचा लाँग मार्च सुरु झाला. सुरुवातीला मोर्चा शांततेनं निघाला होता, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यावर आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स ओलांडून फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पोलिसांना काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
विदर्भ राज्य आणि वीज दरासंदर्भात विदर्भवादी आक्रमक
वेगळं विदर्भ राज्य ही विदर्भवादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच विज दरवाढीसाह इतर मागण्यांसाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबतच नव्यानेही प्लांट उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भवाद्यांचा विरोध आहे.
फडणवीस यांच्या निवास्थानच्या पोलीस सुरक्षेत वाढ
विदर्भवाद्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने आज विदर्भवादी वीज दरवाढ आणि अन्न धान्यावरील जीएसटीच्या विरोधात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या घरावर लाँगमार्च काढण्यात आला. संविधान चौकातून विदर्भवाद्यांच्या या लाँग मार्चला सुरुवात झाली आणि धरमपेठ येथील निवास्थानवर मोर्चा पुकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संविधान चौक आणि धरमपेठ भागात पोलीस बंदोबस्त वाढवला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..