“अपात्रतेचा निर्णय शिंदेंच्या बाजूने लागेल”, बच्चू कडूंच्या विधानावर ठाकरे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला ठाकरे गटातील आमदारांची बाजू ऐकून घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलं आहे.
अशात बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेची निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाबाबत मजबुतीने आणि चलाखीने कामगिरी बजावली. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. काहीतरी कुरापती काढून विलंब लावला जात आहे. बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून कळतं की, निर्णय काय द्यायचा हे आधीच ठरलं होतं की काय? पण, आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आहे. म्हणून अध्यक्षांनी दिलेला निकाल अखेरचा असेल, अशी शक्यता नाही,” असं दानवेंनी म्हटलं.
दररोज एक असे ५३ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत, यावर विचारल्यावर अंबादास दानवे म्हणाले, “हा वेळकाढूपणा असल्याचं मी बोललो आहे. सगळ्या आमदारांची बाजू एकत्रच ऐकली पाहिजे. ४० गद्दार आणि आमचे आमदार काय वेगळी भूमिका मांडणार आहेत?”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..