ज्ञानवापी प्रकरणी हिंदू गटाला झटका..! ‘ही’ याचिका हायकोर्टानं फेटाळली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनौ :- ज्ञानवापी परिसरात बिगरहिंदूंना प्रवेश बंदी करण्यात यावी, यासाठी आलाहाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ही याचिका आज हायकोर्टानं फेटाळली. राखी सिंह आणि इतरांनी ही याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रितींकर दिवाकर आणि न्या. आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याचिकेत काय म्हटलंय?
या जनहित याचिकेत मागणी करण्यात आली होती की, “श्रृंगार गौरी केसमध्ये जोपर्यंत वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय येत नाही. तोपर्यंत परिसरात बिगरहिंदूंना प्रवेशबंदी करण्यात यावी आणि ज्ञानवापी परिसरात मिळालेल्या हिंदू प्रतिकांना संरक्षित करण्याचे आदेश देण्यात यावेत”
यात पुढे म्हटलं की, वाराणसीत श्री आदि विश्वेश्वर मंदिराच्या (सध्याचं ज्ञानवापी परिसर) प्राचीन अवशेषांना वाचवायचं आहे. तसेच यात असाही दावा करण्यात आला आहे की, वादग्रस्त जागेवर एक भव्य मंदिर होतं जिथं भगवान शिवानं स्वतः ज्योतिर्लिंगची स्थापना केली होती.
औरंगजेबानं नष्ट केलं होतं मंदिर
असं सांगितलं जात की, सन १६६९ मध्ये मुस्लिम शासक औरंगजेबनं हे मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. या मंदिरला उद्ध्वस्त केल्यानंतर मुस्लिमांनी अनधिकृतरित्या मंदिर परिसरात अतिक्रमण केलं आणि एक नवं बांधकाम केलं जी आज ज्ञानवापी मशीद आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..