मी शरद पवारांसोबतच, जयंत पाटलांकडून अमित शहांच्या भेटीच्या वृत्ताचे खंडन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2 दिवसांच्या पुणे दौर्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचे वृत्त रविवारी सकाळी वार्यासारखे पसरले आणि जयंत पाटील भाजपात प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आले.
यानंतर दुपारी प्रसार माध्यमांसमोर येऊन जयंत पाटील यांनी मी शरद पवार यांच्यासोबतच आहे. एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू होणे योग्य नाही. काय झाले, काय नाही याचा अभ्यास बातमी देणार्यांनी केला पाहिजे, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आमदारांनी 2 ऑगस्ट रोजी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडून झालेल्या राजकीय भूकंपानंतरही जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. मधल्या काळात दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील नियमबाह्य रितीने पदावर होते, असे आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये खेळीमेळीचेच वातावरण राहिले. कुठल्याही गटाकडून ना एकमेकांवर आरोप झाले ना कारवाईची भाषा झाली. त्यामुळे जयंत पाटील हेदेखील अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. त्यातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने जयंत पाटील यांनी पुण्यात अमित शहांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
या चर्चांचे खंडन करताना जयंत पाटील म्हणाले, माझी सकाळपासून या बातम्यांमुळे करमणूक होतेय, मी इकडे गेलो, मी पुण्याला गेलो अशा.अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, मी आणि अजून एकजण रात्री दीड वाजेपर्यंत इथेच बसलेलो होतो. मग मी कधी पुण्याला गेलो. सकाळी, काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी तिकडे कधी गेलो? मी त्यांना कधी भेटलो याचे संशोधन झाले पाहिजे.
अजित पवार गट बातम्या पेरतो असे मी म्हणणार नाही, बातम्या पेरणारे तुम्ही आहात. मी काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. त्यानंतर मी आणि काही सहकारी माझ्या निवासस्थानी रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा करत बसलो होतो. यानंतर मी सकाळी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. यात मी मुंबईहून पुण्याला जाऊन अमित शहांना कधी भेटलो? हे तुम्हीच सांगा. माझा पक्ष मोठा व्हावा, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. भाजपसोबतच्या कोणत्याही नेत्यासोबत माझी चर्चा झालेली नाही. माझ्याबद्दल ज्या बातम्या चॅनल्सवर येत आहेत, त्याने माझी करमणूक होत आहे. अशा बातम्या पसरवणे चांगले नाही.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..