आता भाजप खासदाराचे लोकसभा सदस्यत्व जाणार..! कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांची खासदारकी अबाधित ठेवली. राहुल यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
आता भाजपच्या एका खासदाराची खासदारकी धोक्यात आली असून स्पेशल कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजपचे लोकसभा खासदार रामशंकर कथेरिया यांना आग्रा येथील विशेष न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्या आदेशाची प्रत अद्याप लोकसभा सचिवालयाला प्राप्त झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशाची प्रत दुपारनंतर लोकसभा सचिवालयाला मिळू शकते. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच लोकसभा सचिवालय रामशंकर कथेरिया यांचे सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावू शकते.
भाजप खासदार कथेरिया यांना शनिवारी 2011 मध्ये वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आग्रा येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. टोरेंट पॉवर कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी 2011 मध्ये कथेरियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राज्यात मायावतींच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाचे सरकार होते.
कोणत्याही गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोक प्रतिनिधीला तातडीने अधिनियम १९५१ नुसार निलंबीत करण्यात येतं. राहुल गांधी यांना देखील दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..