अजित पवार असं काय म्हणाले की अमित शाह यांना हसू आवरेना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. तर, पुण्यातील आरोग्य शिबीरीलाही अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमांच्या निमित्ताने अमित शाह आणि अजित पवार हे पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणामुळे अमित शाह यांना हसू आवरेनासे झाले होते.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात अमित भाई हे गुजरातचे आहेत. पण, त्याचं महाराष्ट्रावर अधिकचं प्रेम आहे. अजितदादांनी असं म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर अजित पवार पुढे म्हणाले, अरे थांबा थोडं, ते प्रेम का आहे, हे ऐका. ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असते. हे अमित भाईंच्या रूपाने पहायला मिळतं. अजित दादांनी असे म्हणताच अमित शाह यांना हसू आवरेना.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..