बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, हत्या की आत्महत्या…? चर्चांना उधाण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी निंगनूर येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीचा मृतहेद विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या या तरुणीची आत्महत्या आहे की हत्या याबाबत परिसरात चर्चा आहे.
कविता नारायण आगोशे (१७) रा. अनंतवाडी, निंगनूर असे मृत मुलीचे नाव आहे.
कविता दररोज आपल्या आईसोबत शेतात काम करण्यासाठी जात असे. ३ ऑगस्ट रोजी ती एकटीच शेतात गेली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती कुठेच आढळली नाही. दरम्यान शनिवारी तिच्याच शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. ही माहिती निंगनूर येथील सरपंच बरडे यांनी बिटरगाव पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह विहिरीतून काढून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
ही तरुणी मतिमंद असल्याचीही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे तिने आत्महत्या केली की या घटनेमागे अन्य कारण आहे, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..