अधिवेशन संपताच शरद पवार गटाची आज बैठक, ‘या’ विषयांवर होणार चर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज 5 ऑगस्ट दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संपन्न झालं.
अधिवेशन संपताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या आगामी कार्यक्रमांबाबत, दौऱ्याबाबत देखील चर्चा होणार आहे. सध्या शरद पवार गटाला जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र भरुन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करायची आहेत.
याची सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहे. राष्ट्रवादीचे युवकचे पदाधिकारी आमदार रोहित पवार हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत.
आगामी काळात पक्ष चिन्ह गेलं तर काय करायचं, ते कोणतं असावं या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. यासोबतच प्रतिज्ञापत्रांची सद्यस्थिती या विषयांवर चर्चा होणार आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सभा आणि प्रचार कसा असेल, याबाबत बैठकीत नियोजन होणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार 15 ऑगस्टनंतर महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
शरद पवार गटाची बैठक होत असताना त्याआधी आज दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील बैठक होणार आहे. आज दुपारी 12 वाजता मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये बैठक होणार आहे.
बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते उपस्थितीत राहणार आहेत. बैठकीत विरोधकांची आघाडी इंडिया महाविकास आघाडीच्या आगामी रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..