सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले, बॉलिवूडवर शोककळा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवले आहे. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे समजते. बुधवारी तिथे ते मृतावस्थेत सापडले आहेत.
त्यांच्या मृत्यूची घटना रात्रीच घडली आहे. पण सकाळी कामगार साफसफाईसाठी स्टुडिओत गेले असता त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
९० च्या दशकांमध्ये बहुचर्चित तमस या दुरदर्शनवरील आपल्या कारकिर्दिला प्रारंभ केला होता. त्यानंतर १९९४ मध्ये १९४२ लव्ह स्टोरी या चित्रपटाने त्यांनी स्वतंत्रपणे बॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. यानंतर बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून त्यांची अल्पावधीत ख्याती झाली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दित हम दिल दे चुके सनम, लगान, जोधा-अकबर, देवदास, प्रेम रतन धन पायो आदी चित्रपटाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.
गेल्या काही नितीन देसाई यांचे एन. डी. स्टुडिओत वास्तव्य होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड हादरले आहे. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००५ मध्ये त्यांनी कर्जत येथे ५२ एकरमध्ये एनडी स्टुडिओ उभारला. त्यांनी रिअॅलिटी शो बिग बॉस होस्ट केले होते.
देसाई यांचा ९ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. ते या आठवड्यात ५८ वर्षात पदार्पण करणार होते. पण वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांनी आपले जीवन संपवले आहे. दोन दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि इतरांसह अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले होते.
केवळ चित्रपटच नाही तर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे अनेक सीझनही त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..