मुंबई येथे काँग्रेसच्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी गुन्हा दाखल ; जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २९ जणांविरूद्ध गुन्हा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मणिपूरमधील घटनेविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी काढलेल्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. जमावबंदीचे आदेश धुडकावून परवानगी न घेताच मोर्चा काढल्याप्रकरणी काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री आरीफ नसीम खान, चरणजीतसिंह सपरा यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाशेजारी अडवून नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
मणिपूरमधील घटनेला २ महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेले, मात्र अद्याप ठोस कारवाई होत नसल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस कार्यालयाजवळून सोमवारी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सीएसएमटी स्थानकाजवळ हा मोर्चा अडवला. या मोर्चामध्ये वर्षा गायकवाड यांच्या समवेत माजी खासदार संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार जिशान सिद्दीकी, चरणसिंग सप्रा आदी नेत्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. परवानगीशिवाय मोर्चा काढणे व जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..