संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- माजी मंत्री, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून ही धमकी देण्यात आली आहे. असंच बोलत राहिलात तर दाभोळकर करू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना दिला आहे.
या धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आमदार यशोमती ठाकूर या देखील आक्रमकपणे या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला. हरामखोर बाई कोण आहे स्पष्ट करा, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दाभोळकर असाच ओरडत होता. एकदिवस जन्नतमध्ये पाठवला. धारकरी कोथळा बाहेर काढतात, हे लक्षात असू द्या, असं म्हणत ठाकूर यांना धमकावण्यात आलं आहे.
आपल्या तत्वांशी, विचारांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा इतिहास गद्दारांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज इतिहासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवलीय. आज जर आपण चुकलो तर हा देश आपल्याला माफ करणार नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर द्वेष पेरणाऱ्यांना थारा देऊ नका. जय हिंद!, हे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्या ट्विटवर केलेल्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आली आहे.
यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया
तुम्हाला काय करायचंय ते करा. मला मारायचं असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. पण माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..