महागाव नगरपंचायत नगराध्यक्षांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे तडकाफडकी राजीनामा ; सत्तासंघर्ष पेटणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष सुरेश पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यमान नगरध्यक्षा करुणा शिरबिरे यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.त्यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे आज( ता.३१)यांच्याकडे दिला आहे.त्यामुळे आता सव्वा वर्षाच्या काळासाठी सत्तासंघर्ष पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
महागाव नगरपंचायत मध्ये भाजपा शिवसेना आणि काँग्रेसचे दोन नगरसेवक असे सत्तेचे समीकरण कार्यरत आहे. भाजप आणि शिवसेनेचे सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये प्रत्येकी सव्वा वर्षाचा नगराध्यक्ष देण्याचा सर्वानुमते अंतर्गत ठराव झाला होता. सुरुवातीचे सभा वर्ष शिवसेना आणि नंतरचे सव्वा वर्ष भाजपाचा नगराध्यक्ष राहील असा त्यांचा अंतर्गत करार झाला होता. या करारानुसार शिवसेनेच्या करुणा शिरबिरे या नगराध्यक्षपदी तर
भाजपाचे सुरेश नरवाडे उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते.मे मध्ये सव्वा वर्षाचा कालावधी संपला. दोन महिने उलटले तरीही नगरपंचायत प्रस्तावित सत्ता बदल झाला नसल्याने भाजपामध्ये संतापाची लाट उसळली होती.भाजपला नगराध्यक्ष मिळावे यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक आडे यांनी मोठी पराकाष्टा केली. आणि शिवसेनेला विश्वासात घेऊन शिवसेनेचे नगराध्यक्ष यांचा राजीनामा देण्यास भाग पाडले. तत्पूर्वी भाजपाचे उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांनी आपला राजीनामा नगराध्यक्ष करुणा शिरबिरे यांच्याकडे दिला. त्यांनी तो मंजूरही केला. नगराध्यक्षांचा राजीनामा देण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकाऱ्यात दालनात पोहोचले. मात्र जिल्हाधिकारी दौऱ्यावर असल्याकारणाने ते राजीनामा देऊ शकले नसल्याने विविध चर्चेला उधाण आले आले होते .परंतु आज शिवसेनेच्या नगराध्यक्ष करुणा शिरबिरे यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दिल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

आरोग्य सभापती प्रमोद भरवाडे यांचाही राजीनामा :
महागाव नगरपंचायत मध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्य पूर्वी शिवसेना ( उबाठा) तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांनी त्यांचा आरोग्य सभापती पदाचा राजीनामा नगराध्यक्ष करुणा नारायण शिरबिरे यांच्याकडे सुपूर्त आहे. मी माझ्या वयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद आहे.हे विशेष
दिलेला शब्द पाळला म्हणून राजीनामा : नगराध्यक्षा करुणा शिरबिरे
भाजपा सोबत अलिखित करारात सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. दिलेला शब्द पाळला.त्यानुसार राजीनामा दिला आहे. माझी भूमिका मी काही दिवसात स्पष्ट करणार आहे.त्यानंतर कोणा सोबत सत्तेत बसायचे हे ठरवल्या जाईल.
करुणा शिरबिरे
नगराध्यक्ष न.पंचायत महागाव
अभद्र युतीत रस नाही ; मवीआ मध्ये राहणार : प्रमोद भरवाडे
नगराध्यक्षा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाल्याने मी त्यांच्या अगोदर राजीनामा नगराध्यक्षा यांच्याकडे दिला आहे.अभद्र युती ( उबाठा ) नगरसेवकांना मान्य नाही.मी महाविकास आघाडी सोबत आहे.आणि राहणार. महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्यावर ( उबाठा) विचार विनिमय करून पुढील पावले उचलली जातील.
प्रमोद उर्फ शाखा भरवाडे
शिवसेना (उबाठा) गट तथा
नगरसेवक महागाव न. पंचायत

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..