कबुली देताना बाळासाहेबांची आठवण आली नाही; ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपाचा निशाणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात शनिवारी (29 जुलै) पार पडलेल्या हिंदी भाषिक मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काँग्रेससोबत खुलेआम गेलो.
तुमच्यासारखं लपून छपून गेलो नव्हतो. मला एक प्रश्न त्यांनाही विचारायचा आहे की, आम्हाला काँग्रेससोबत जाण्यासाठी कुणी भाग पाडलं, असं म्हणत भाजपावर निशाणा साधला. याचपार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, ग्रेस सोबत सरळ मार्गानं जाण्याची कबुली देताना बाळासाहेबांची आठवण आली नाही, हे दुर्देव, असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
चित्र वाघ म्हणाल्या की, काळू बाळू मुलाखतीच्या प्रचंड यशानंतर ठाण्यातील नाट्यगृहात सोंगाड्याचा एकपात्री प्रयोग झाला. सोंगाड्यानं सोंग आणलं. कॉंग्रेस सोबत सरळ मार्गानं जाण्याची कबुली देताना बाळासाहेबांची आठवण आली नाही, हे दुर्देव. तुम्ही कॉंग्रेस सोबत गेलात आणि तुमचं दुकान बंद पडलं, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन रडगाणी मांडवी लागतायेत
उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलताना चित्र वाघ म्हणाल्या की, आधी तुमच्या दारात येऊन लोकं गाऱ्हाणी मांडायचे, पण तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं, त्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारात जाऊन रडगाणी मांडावी लागत आहेत, यापेक्षा नियतीचा सूड तो काय असू शकतो?, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ठाण्यात आयोजित हिंदी भाषिक मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी काँग्रेससोबत खुलेआम गेलो. तुमच्यासारखं लपून छपून गेलो नव्हतो. मला एक प्रश्न त्यांनाही विचारायचा आहे की, आम्हाला काँग्रेससोबत जाण्यासाठी कुणी भाग पाडलं. भाजपसोबत आम्ही 25 -30 वर्षे एकत्र होतं. हिंदुत्वासाठी भाजप आणि शिवसेना फेव्हिकोलसारखी एकत्र होती. परंतु ही जोड पहिल्यांदा भाजपाने तोडली. पण मला आजारपणातल्या गळ्याभोवतीच्या पट्ट्यावरुन हिणवलं गेलं. तसे पट्टे बांधणारा कधी पैदा झाला नाही आणि कधी होणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..