अजितदादांच्या ताकदीनंतर निवडणुकांबाबत महायुती घेणार मोठा निर्णय ; लवकरच बैठक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर नाराज झालेले शिंदे गटाचे आमदार निधीवाटपानंतर ‘बॅकफूट’वर गेल्याचे दिसत आहेत. महायुतीच्या सरकारमधील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील आमदारांची नाराजी दूर करून संवाद वाढवण्यासाठी १२ जणांची समन्वय समिती स्थापन केली आहे.
आता लवकरच या तीनही पक्षांची एकत्रित सभा होणार असल्याचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितले आहे. बैठकीत पुढील निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे-फडणीस-पवारसरकारच्या समन्वय समितीच्या माध्यमातून लवकरच एका सभेचे आयोजन केले जाणार आहे. या सभेत देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीच्या वतीने पावले उचलून राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता आहे. यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तटकरेंनी यावेळी महाआघाडीसह उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ‘इंडिया’ची खिल्ली उडवताना तटकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी सर्वजण एकत्र येताहेत म्हटल्यावर मोदींची ताकद लक्षात येते. ‘इंडिया’ झाले तरी त्यांना विरोधीपक्ष म्हणूनच काम करावे लागेल. इंडियाच्या किती बैठका झाल्या तरीही मोदींनी सांगितले ‘ईस्ट इंडिया’ कंपनी आहे. भारत लुटायला आली आणि त्याची सुरुवात मुंबईतून केली आहे. पहिल्या दोन बैठका बाहेर झाल्या असल्या तरी आता मुंबई कशी लुटायची याबाबत मुंबईत चर्चा करतील.”
उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना सुनील तटकरे म्हणाले, “उध्दव ठाकरे यांना पक्ष राहिला नाही. त्यांच्याकडे आमदार राहिले नाहीत, कार्यकर्तेही नाहीत. ते मी आणि माझे कुटुंब हीच माझी जबाबदारी एव्हढ्यापुरतेच ते राहिले आहेत.” संभाजी भिडेंवर कारवाई होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. “संभाजी भिडे यांचे वक्तव्य कुठल्याही माध्यमातून आलेले नाही. कोणी तरी सांगितले म्हणून वक्तव्य पुढे येतय, यात चूक असेल तर कारवाई होईल”, असही तटकरे म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..