मलकापूर बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मलकापूर :- मलकापूर शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रेल्वे उड्डामपुलाजवळ दोन खासगी प्रवाशी बसच्या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्याकडून त्यांनी अपघाताची सविस्तर माहिती घेत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
२९ जुलै रोजी पहाटे तीन वाजता झालेल्या या अपघातामध्ये सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनाही त्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्यासोबत डॉ. प्रशांत पाटील, बुलढाणा वन मिशनचे संदीप शेळके यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..