रोहित पवारांनी केली चक्क अजित पवारांसोबत लंच पे चर्चा, अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात मागील अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये कर्जत -जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा या भेटीमध्ये चर्चेला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमागे मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अर्ध्या तासांपुर्वी रोहित पवार अजित पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासुन या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.
कर्जत -जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी सभागृहात मांडला होता. तर यासंदर्भात त्यांनी विधानभवनाच्या आवारात पावसात एकट्याने आंदोलनही केलं होतं. तर या कारणासाठी रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. एमआयडीसीचा विषय रोहित पवार यांनी लावून धरला होता, त्यानंतर दोघांची भेट महत्वाची मानली जात आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांनी दालनात चर्चेनंतर एकत्र जेवण केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्यासह ८ आमदांरानी शिवसेना-भाजपला समर्थन देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर या फुटीनंतर आज रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..