आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते, रस्ते तुडवत पाहणीला जातो; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- इर्शाळवाडीत दिखाव्यासाठी गेलो नाही. आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही. दरडग्रस्तांची तात्पुरती कंटेनरमध्ये सोय करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिली.
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्याचा पाचवा दिवस आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली.
कृषी सेवकाचं मानधन वाढवून १६ हजार रुपये करण्यात आले. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे. विरोधकांनी टीका केल्या आम्ही कामातून प्रत्युत्तर देतोय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. माझं सरकार, माझी जबाबदारी एवढ्यापुरती आमची जबाबदारी नाही. आम्ही तोंडाची वाफ दवडत बसत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
आमच्या कामाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे काही जणांची पोटदुखी होतेय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही जे काही निर्णय घेतलेत, ते जनतेच्या भल्यासाठी घेतले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत, रस्ते तुडवत पाहणीला जातो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीसांची कामे स्थगित केली होती. हे आमचं सरकार आल्यावर लगेच ती कामे सुरु करण्यात आली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..