महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम ; संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा घसरली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे पुन्हा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत. त्यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल हे विधान केले असून यामुळे कॉँग्रेस आक्रमक झाली आहे.
भिडे हे अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी हे विधान केले. भिडे म्हणाले, गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत. भिडे यांच्या या व्यक्तव्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असतात. त्यांनी या पूर्वी देखील अनेक विधाने केली आहेत. त्यांच्या विधानांमुळे राज्यातील राजकारण देखील ढवळून निघाले आहे. गुरुवारी रात्री अमरावती येथील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिडे यांनी गांधीजी यांच्यावर वादग्रस्त विधान केले.
भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम व्यक्तीने केले. दरम्यान, याचे सबळ पुरावे देखील आहेत असा दावा देखील भिडे यांनी केला.
या सोबतच देशात सर्वधर्मसमभावाचा उपदेश द्यायला नको. असे उपदेश देणाऱ्यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे देखील भिडे म्हणाले. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असेही भिडे म्हणाले.
भिडे यांचा वादग्रस्त व्यक्तव्याचे पडसाद विधानसभेत देखील पाहायला मिळाले. कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत, असे देखील चव्हाण म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..