आम्ही सुद्धा माणसंच आहोत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पिलवार
हिवरा संगम :- अनंतवाडीच्या बेटाप्रमाणेच धनोडा येथील जुन्या गावाला सुद्धा पैनगंगेच्या पुराने विळखा घातला होता. अनंतवाडी केंद्रस्थानी पकडून संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा आनंतवाडीवर फोकस देत आहे. येथील लोकांची एस डी आर एफ च्या प्रयत्नाने सुखरूप सुटका सुद्धा झाली. पण याच प्रमाणे पैनगंगेच्या तीरावर असलेल्या धनोडा येथील अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या जुन्या वस्तीला पैनगंगेच्या महापुराने विळखा घातला होता येथे 15 घरांची वस्ती असून अनेकांनी रात्री आलेल्या महाभयंकर पावसानंतर आपले घरदार अन्नधान्य सामान सोडून तिथून जीवाच्या आकांताने ते ठिकाण सोडले. पण तिथे 25 नागरिक अडकून पडले होते या लोकांची एसडीआरएफ च्या टीमने बोटीच्या सहाय्याने सुटका केली पण दुसऱ्या दिवशी येथील परिस्थिती अतिशय बिकट होती घरामध्ये दोन ते तीन फूट गाळ चिखल साचला होता. घरातील बरेचसे साहित्य भांडीकुंडी अन्नधान्य अक्षरशः मुलांची खेळणी शालेय साहित्य वह्या पुस्तके वाहून गेले होते. पूर ओसरल्यानंतर अद्याप चार दिवसानंतर सुद्धा येथील पूरग्रस्ताकडे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने ढुंकूनही पाहिले नाही. शेतकरी व्यापारी असलेले येथील संजय अराडे यांचा दहा क्विंटल कापूस अक्षरशः सडून गेला आहे. तर लक्ष्मण दत्तात्रय अराडे यांच्या हॉटेलमधील सर्व साहित्य वाहून गेले आहे. त्याच प्रकारे प्रवीण जयस्वाल यांच्या किराणा दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वस्तीतील निर्मला बाई जयस्वाल, शेख इमाम, उस्मान पठाण, संभाजी आन्ने, नूर शेख ,अमोल अन्ने, मदन राठोड, नंदनवार महाराज आदी लोकांचे सुद्धा घर साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
आम्ही सुद्धा माणसंच आहे
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथे वास्तव्यास असून अनेक छोटे छोटे पूर बघितले पण यावेळेस आलेला हा भयंकर महापूर आमच्यासाठी जीवाचा थरकाप उडवणारा होता. आनंतवाडी च्या बेटावर प्रशासकीय यंत्रणा जशी लक्ष ठेवून आहे तसे आम्ही सुद्धा त्याच परिस्थितीत इथे आहोत. अजून पर्यंत कोणत्याही नेते पुढारी हेच काय गावातील तलाठ्याने सुद्धा आमच्याकडे फिरून सुद्धा पाहिले नाही. आम्ही सुद्धा माणसंच आहोत त्यामुळे सरकारने आमच्याबद्दल सहानुभूती दाखवून आमच्या वस्तीचे पुनर्वसन करावे हीच आमची मागणी आहे.अशी आपबीती येथील पूरग्रस्त शेतकरी संजय आराडे यांनी पॉलिटिक्स स्पेशल प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..