अजित पवार गटाविरोधात ठोस भूमिका का नाही? शरद पवार गटाचे आमदार बैठकीत आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले. यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येवल्यात सभा घेत दंड थोपटले होते.
मात्र येवल्यातील सभेनंतर शरद पवार गटात शांतता पसरली. उलट पावसाळी अधिवेशनात शरद पवार गट आणि अजित पवार गटातील आमदार एकत्र चर्चा करताना दिसले.
मात्र शरद पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला पाठिंबा देणार नाही, संघर्षासाठी तयार राहा, असे शरद पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या आमदारांचे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या बैठकीत येवल्याच्या सभेनंतर सभा नाही.अजित पवार गट विरोधात ठोस भूमिका नाही, असे प्रश्न आमदारांनी उपस्थित केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आता शरद पवार यांच्या गटावा नोटिस बजावली आहे. त्यामुळे शरद पवार यांची पुढील भूमिका काय असेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असेल, पण तो विखुरलेला दिसत नाही. याचे ताजे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या निधीच्या वाटपात पाहायला मिळाले.
तसेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत अजित पवार गटाते नेते सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीचा खास क्षण समोर आला. एवढेच नाही तर दोघांनी मिठी मारली आणि काही वेळ गप्पा मारल्या. मात्र, दोघांमध्ये काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भेटल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादीत फूट पडल्याने अजित पवार यांनी स्वत:ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष घोषित केले होते. तर खुद्द शरद पवार राष्ट्रवादीच्या सर्वोच्च पदावर होते. भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अजित पवार यांना अध्यक्ष म्हणूनही दाखवण्यात आले आहे. याउलट महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले पद कायम ठेवले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..