“बैठकीला गोव्याला न्या”; अनिल परबांची मागणी, नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “तुम्ही रिसॉर्ट सुचवा”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, यातच विधान परिषदेत एका मुद्द्यावर सदस्यांमध्ये चर्चा सुरू असताना, बैठकीसाठी गोव्याला न्यायाची मागणी ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी केली.
यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी तुमचा अभ्यास आहे, तुम्ही रिसॉर्ट सुचवा, अशी मिश्लिक प्रतिक्रिया दिली. यावरून सभागृहात एकच हशा पिकला.
राज्याचे शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीबाबत अब्दुल्ला खान दुर्रानी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा करतांना अनिल परब आणि दीपक केसरकर यांच्यात टोलेबाजी झाली. यावर उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही वक्तव्य केले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अब्दुल्ला खान दुर्रानी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. मात्र उत्तरात समाधानी न झालेल्या आमदारांनी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली. त्यावर अनिल परब यांनी सूचना करताना, ही बैठक गोवा- सिंधुदुर्ग घेण्यात यावी. मागे आपण काही आमदारांची त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. हे आम्हाला माहिती आहे. आता आम्हालाही घेऊन जावा आणि आमच्याही शंकेचे निरासन करावे, असा चिमटा काढला.
परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?
नीलम गोऱ्हे यांनी सर्व आमदारांचे मते जाणून घेतले. यावेळी अनिल परब सतत हात वर करत होते. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, परब तुम्हाला बैठकीला जायचे आहे का?, त्यावर परब म्हणाले माझी सूचना आहे. यावर, तुमचा अभ्यास असेल तुम्ही रिसॉर्ट वैगेर नंतर सांगा, अशी मिश्लिक टिप्पणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..