ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन ; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी (25 जुलै) प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं.
दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी (LLB) केलं. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.
शिरीष कणेकर यांच्याबद्दल जाणून घ्या… (Who Is Shirish Kanekar)
रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी खूप लेखन केलं आहे.
मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’, नाशिक महापालिका वाचनालयातर्फे ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार, ‘लगाव बत्ती’ या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी शिरीष कणेकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
शिरीष कणेकर यांनी आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण केलं आहे. तसेच एखाद्या समस्येवर विनोदी शैलीतून बोट ठेवणारे लेखक म्हणून ओळखले जाणारे शिरीष कणेकर आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांच्या आवडीचे विषय होते. क्रिकेट व सिनेसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..