‘उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करु; पवारांनी राऊतांना स्पष्टच सांगितलं….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात मोठं खळबळजनक वळण आलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. आज शिंदे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जातंय.
यात अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चा आहेत.
याप्रकरणी आपल्याला काही माहिती नसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. तर, सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता संजय राऊत यांनी आणखी मोठी अपडेट दिली आहे.
राजकारणाचं मातेरं
“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
शरद पवार म्हणतात मी खंबीर
संजय राऊत पुढे म्हणाले, की माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू..”
यासोबतच जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं देखील संजय राऊत आपल्या ट्विवटमध्ये म्हणाले आहेत.