‘ती’ बैठक ठरली अजित पवारांच्या बंडाचे कारण, मोठी माहिती समोर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ३० ते ४० आमदारांसह राजभवनात पोहोचले आहेत. हे सर्व आमदार त्यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण वेगाणे बदलत आहे. अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते राजभवनात पोहोचले आहेत.
अजित पवार यांनी बंडाचे हत्यार का उपसले याचे अनेक कयास लावले जात आहेत. दरम्यान पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने महत्त्वाचे कारण दिले आहे.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पाटण्यात जाऊन विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहून काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत स्टेज शेअर केल्याने अजित पवारांचे समर्थक नाराज झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असे, पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. समर्थक आमदारांना मंत्री केले जाऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात पोहोचले आहेत. काही काळ राष्ट्रवादीत सर्व काही ठीक चालले नव्हते. शरद पवार यांनी तर मंचावरून राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, अचानक झालेल्या मोठ्या उलथापालथीचे कोणालाच भान नव्हते.