चार शहरे बंद
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर : मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर ३१ मार्च पर्यंत ‘लॉक’
या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे आदेश सरकारी यंत्रणांकडून मिळाले आहेत.त्यामुळे कोणीही बाहेर फिरायला जाऊ नये, ही फिरण्याची सुटी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत आणण्यात आली आहे. या चार शहरांमधील बंद ३१ मार्चपर्यंत नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सांगीतले.
पाणी पुरवठा, मलनि:स्सरण विभाग, बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा , रेल्वे व सार्वजनिक वाहतूक, खाद्यपदार्थ, किराणा सामान, भाजीपाला, रूग्णालये, वैद्यकीय केंद्रे, औधधांची दुकाने, वीजपुरवठा, पेट्रोल पंप, आयटी उद्योग आणि प्रसार माध्यमे या सेवा सुरू राहणार आहेत तर शाळा, तरण तलाव, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, स्पा क्लब, पब, डिस्कोथेक, उद्याने, अॅम्युझमेंट पार्क तसेच गर्दीची सर्व ठिकाणे, विलगीकरण केंद्राच्या परिसरात वाहतुकीवर निर्बंध, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जमण्यास बंदी ही ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
मद्यालये आणि पाणटपर्यांना देखील दोन दिवसांपासून बंद ठेवण्याचे आदेश मिळाल्याने छुप्या पध्दतीने अनेक ठिकाणी खर्रा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे.

सत्तेसाठी हापापल्या “उमा”ने पक्ष टांगला वेशीवर ; ताई ऐवजी केली भाऊशी हात मिळवली…
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..