शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार…? मंत्री संजय राठोड यांनी दिली महत्वाची माहिती….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत भाजपची तक्रार केली होती.
त्यानंतर शिंदे गट- भाजपमध्ये बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचदरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
दोन दिवसापूर्वी शिंदे गटातील खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली होती. यात खासदारांनी आपले प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले. या बैठकीत गजानन किर्तीकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.
याचदरम्यान, शिंदे गट-भाजपमधील मतभेद समोर येत असताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूतोवाच केले आहे.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूतोवाच केले आहे. त्यांचाही प्रयत्न आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार व्हावा. कारण या दोघांकडे विविध खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर देशातल्या १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली. ‘लोकशाहीचं अतिशय सुंदर मंदिर होत आहे.
मात्र, विरोधकांना विरोध करायला अनेक मुद्दे आहेत. पण अशा पवित्र मंदिराचा विरोध करणे चुकीचे आहे. लोकशाहीच्या मंदिराचा सर्वांनी आदर करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.