तात्काळ पंचनामा करून मोबदला मिळवून देणार – आ. विनोद अग्रवाल
विदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गोंदिया तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात मोठा फटका बसला असून रब्बी शेतीतील हरभरा, गहू, जवस, लाखोडी, तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे तसेच विविध ठिकाणी विजेचे खांब कोसळून गावे अंधारात आहेत काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाले तर काही ठिकाणी संपूर्ण घर जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून येते. आमदार विनोद अग्रवाल यांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन मुक्का चौकशी करत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. गोंदिया तहसीलदार रोहन घुगे, कृषी अधिकारी धनराज तुमडाम, ग्राम विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील अवकाळी पावसाच्या प्रकोपामुळे क्षतीग्रस्त झालेल्या गावांना भेटी दिल्या. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचे सूचना केल्या. गावातील विद्युत खांबांना त्वरित पूर्ववत करून गावात विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्याचे सुद्धा विद्युत विभागाला मौका ठिकाणाहूनच आमदार विनोद अग्रवाल यांनी सूचना केले. वादळवाऱ्यात घरे क्षतिग्रस्त झाल्याने कित्येक परिवार चव्हाट्यावर आले असल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था व तसेच त्यांना शासनाच्या निधीतून नुकसान भरपाई आणि घर बांधण्यासाठी निधी ताबडतोब उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले. अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई चे मदत निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आश्वासन दिले. दुर्गेश रहांगडाले, कमलेश सोनवाणे, चैताली नागपुरे, पृथ्वीराज नागपुरे, चेतन बहेकार, किशोर दुबे, मिलन पाथोडे, धर्मेंद्र पटले, लखन हरिणखेडे, सुभाष मुंदडा, राजू पटले, हंसू वासनिक, प्रकाश शेवतकर इत्यादी मंडळी उपस्थित होती.