जिल्हा कचेरीसमोर कुक्कुटपालन व्यावसायिक बसले आमरण उपोषणावर
- कोरोनामुळे कुकुटपालन व्यावसायिक धोक्यात
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- कोरोना च्या धास्तीने कोंबडीचे मास खाणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाल्याने कुकुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. गोंदिया आता तर चक्क कोंबड्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी कुक्कुटपालन व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आज १२ मार्च पासून आमरण उपोषणावर बसले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यत उपोषण सुरुच ठेवण्याचा निध्रार त्यांनी केला आहे.
हजारो कोंबड्या पोल्ट्रीफाम्रमध्ये पडून
चिकन पासून कोरोना होतो का, याबाबतीत जनजागृती केली जातेय मात्र, ही भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. हजारो कोंबड्या पोल्ट्रीफाम्रमध्ये पडून असल्याने व्यवसायिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे होळीच्या हंगामात देखील कोंबडीच्या मांसाला अपेक्षित अशी मागणी नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील कुकुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसत असून, मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. झालेला खर्च तरी काढायचा कसा हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे.
सरकारी आँफिसमध्ये हजारो कोंबड्या फेकून देण्याचा दिला इशारा
दरम्यान कुक्कुटपालन व्यावयिकांनी कुकुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, विक्रिकरिता तयार असलेला माल योग्य भावात सरकारने उचलावा. कुकुटपालनासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करावे, परप्रांतातून येणाऱ्या कोंबड्यावर बंदी घालण्यात यावी, अशा मागण्याचे निवेदन जिल्ह्याधिकार्यांना देण्यात आले. जर मागण्या मान्य न झाल्यास सरकारी कायालयांमध्ये हजारो जिवंत कोंबड्या सोडून देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे.