राष्ट्रीय लोकअदालतीचे लाभ घेण्याचे जिल्हा न्यायाधीश पुसद व्ही.बी. कुळकर्णी यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- मा.उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व वकील संघ पुसद यांचे संयुक्त विद्यमाने पुसद येथे शनिवार दिनांक ३०/०४/२०२३ रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे पुसद न्यायमंदीर परीसरात आयोजन करण्यात
आलेले आहे. सदर लोकन्यायालय १०.३० वाजता सुरू होईल. सदर
लोकन्यालयामध्ये सहभागी होवून पक्षकारांनी लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन पुसद तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश क्रं.१ व्ही.बी.कुळकर्णी यांनी केले. न्यायदानाची प्रक्रिया क्लिष्ट आहे.
न्यायालयात असंख्य प्रकरणे तुंबून पडल्याने न्यायालयावरील ताण वाढत
आहे. त्यामुळे गोरगरीबांना जलद गतीने न्याय देण्याचा उद्देश साध्य होत नाही. पक्षकारांना वेळेची व पैशाची बचत करण्यासाठी लोकन्यायालय हे अत्यंत उपयुक्त असुन त्याद्वारे सामोपचार, तडजोडीतून व समजोत्या मधुन न्यायालयीन प्रकरणांत दोन्ही बाजूंना न्याय मिळतो व दोन्ही बाजूचे समाधान होते. व न्यायालयावरील खटल्यांचा भार कमी होवून गोरगरीबांना समाधानाने लवकर न्याय मिळवू शकतो त्यामुळेच लोकन्यायालयाकडे लोकांचा कल
अतिशय वेगाने वाढत आहे. लोकन्यायालय प्रक्रियेवर लोकांचा अधिक विश्वास होत आहे व लोकन्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणांत तडजोडीने खटल्यांचा निकाल होत आहे. असे मत व्ही. बी. कुळकर्णी, पुसद यांनी व्यक्त केले. तसेच येणा-या दिनांक ३०/०४/२०२३ रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयामध्ये मोटार वाहन कायदे अंतर्गत प्रकरणे, मोटार अपघात दावे, प्रकरणे, निगोशीयेबल प्रकरणे, इनस्टूमेंट अॅक्ट कायदे अंतर्गत प्रकरणे, १३८ चे प्रकरणे, बँक व फायनान्सचे प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, शेती-जमिनी अंतर्गतचे
प्रकरणे, करविषयीचे प्रकरणे, पाणीबिल प्रकरणे, दिवाणी न्यायालयाचे प्रकरणे, वैवाहिक वाद प्रकरणे, इत्यांदी प्रकरणांचा समावेश आहे. व ६ पॅनलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पॅनल क्र. १ मध्ये व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधिश क्रं.१ व मोफत विधीसेवेचे वकिल ॲड. महेश पाठक हे आहेत. पॅनल कं. २ मध्ये एस. एन. नाईक, सह दिवाणी न्यायाधीश, व ॲड. एस. एन. खराटे, हे आहेत. पॅनल कं. ३ मध्ये डि.जी. मस्के, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व ॲड. सुशिलाताई नरवाडे हे
आहेत. पॅनल कं.४ मध्ये श्रीमती एस. जी. जाधव, ४थे सह दिवाणी न्यायाधीश मॅडम व ॲड.श्रीमती आढाव हे आहेत. पॅनल कं. ५ मध्ये व्ही.बी. चव्हाण,६वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब व ॲड. अनिता देशमुख हे आहेत. पॅनल कं.६
मध्ये एस.झेड. कादरी ७वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, व ॲड.श्वेता पांढरीपांडे (राजे) हे आहेत. तरी सर्व पक्षकारांनी न्यायमंदीर पुसद येथील राष्ट्रीय लोकअदालत करीता सकाळी १०.०० वाजता हजर रहावे असे आवाहन व्ही.बी.कुळकर्णी सजिल्हा न्यायाधीश क्रं. १ पुसद तसेच अधिक्षक विलास बंगाले, तसेच वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी खराटे पुसद यांनी केले आहे. करीता सर्व पक्षकार, व जनतेने नोंद घेवुन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपली प्रकरणे तडजोडीने निपटारा करावे.