नागपूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर:- तलावात शौचाला गेलेल्या मुलाला बुडत असताना बघून आई मदतीला धावली. मात्र तिचादेखील तोल गेल्याने ती बुडत असल्याचे बघून मुलगी मदतीकरिता धावली. मात्र तीदेखील बुडाली. अशा नागपूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
मुक्ता पटले (३५), आदित्य पटले( १३) व काजल पटले(१०) रा. नागपूर अशी मृतांची नावे आहेत. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे बाबूलाल शरणागत यांच्याकडे लग्न समारंभ होते. त्या समारंभात सहभागी होण्याकरिता मुक्ता पटले या सहभागी झाल्या होत्या. बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुक्ता यांचा मुलगा आदित्य तलावात शौचाकरिता गेला. मात्र त्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले. आपल्या मुलाला वाचविण्याकरिता मुक्ता पाण्यात उतरल्या. मात्र पाणी खोल असल्याने त्यादेखील बुडत होत्या. हे बघताच मुलगी काजल आईला वाचविण्याकरिता धावली. मात्र तीदेखील आपली आई आणि भावासह तलावात बुडाली. या घटनेमुळे एकच शोककळा पसरली. यासंदर्भात प्रत्यक्षर्शींना विचारपूस केली असता तिन्ही मायलेक न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता तलावाच्या काठावर साहित्य दिसून आले. त्यामुळे स्थानिकांच्या मदतीने तलावात जाळ टाकला असता मृतदेह बाहेर निघाले. घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून पोलिस तपास करीत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

वाचकाचे अमाप प्रेम व शासनाच्या सहकार्याने “पॉलिटिक्स स्पेशल” शासकीय यादीवर
गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…