शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक ; गळ्यात कांदा, कापसाची माळ घालून आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे.
मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी आमदार कांद्याला भाव मिळावा म्हणून विधान भवनात कांदे घेऊन दाखल झाले आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी गळ्यात कापूस, लसूण आणि कांद्याची माळ घातली असल्याचे पाहायला मिळाले. मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू असा इशारा यावेळी विरोधकांना राज्य सरकराला दिला.
विक्री झालेल्या कांद्याला प्रती किलो दहा रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे तर कांद्याला प्रतीकिलो 30 रुपये असा हमीभाव द्यावा अशी दुसरी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….