बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या मोठ्या घोषणा ; संजय राठोडांबद्दल म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोहरादेवी :- बंजारा समाजाच्या पोहरावेदी देवस्थान येथे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी ५९३ कोटी रुपये विकासनिधी दिल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, वसंतराव नाईक महामंडळाला कधीही निधी कमी पडू देणार नाही. ५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार असल्याचं सांगून त्यांनी नवी मुंबई येथे बंजारा भवन उभा करणार असल्याचं स्पष्ट केलं.
पोहरावेदी सेवाध्वजाचं लोकार्पण
एकनाथ शिंदे यांनी बंजारा भाषेतून भाषणाला सुरुवात केली
पोहरावेदी सेवाध्वजाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
संत सेवालाल महाराज पुतळ्याचं अनावरण
काय म्हणाले एकनाथ शिंदे…
पोहरादेवीसाठी ५९३ कोटींचा विकासनिधी देण्यात येणार आहे
संजय राठोड पाठवुरावा करतात म्हणून समाजाचा प्रश्न मागे राहणार नाही
वसंतराव नाईक महामंडळाला पैसे कमी पडू देणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे
तांडा वस्ती सुधार योजना बळकटी देणार
५० कोटी रुपये बंजारा महामंडळाला देणार
हे सरकार बंजारा समाजाच्या पाठिशी उभं राहणारं सरकार आहे
नवी मुंबईत बंजारा समाज भवन उभा करणार
संजय राठोड नेहमी समाजाच्या प्रगतीसाठी धडपडत असतात

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….