पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन करण्यात आला होता. या फोन कॉलमुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल मध्ये बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला होता.
कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक फोन कॉल काल एका व्यक्तीने केला होता. मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ असा धामिकाचा निनावी कॉल करण्यात आला होता. बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली होती.
संपूर्ण तपासामध्ये यावेळी कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हा फोन कॉल केल्याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीला हैद्राबाद मधून ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि अशात त्याने हा कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे आणि त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत थेट गुगल चे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….