बच्चू कडूंच्या गौप्यस्फोटातून संजय राऊतांनी काढली हवा, म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई
‘ 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत’ असा दावा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केली होती. पण, बच्चू कडू सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे का, असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. या वादात बच्चू कडूंनी उडी घेतली. त्यांनी 15 आमदार फुटण्याचा दावा केला होता. पण, राऊतांनी आपल्या शैलीत हा दावा खोडून काढला.
बच्चू कडू सुद्धा शिंदे गटामध्ये जात आहे का, असं कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मला माहिती आहे की, भाजपचे काही आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे, बच्चू कडूंची माहिती खरी आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला. जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरत नाही, किंवा ते ठरवत नाही. तोपर्यंत त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतो.
कारण, मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी या राज्यातील भाजप आणि मिंधे गटाला जिंकणे अशक्य आहे. किंवा मोदीआले आणि सगळा देश जरी लावला तरी ते जिंकू शकत नाही, याची खात्री झाली आहे त्यामुळे मोदींचा पत्ता सारखा टाकत आहे.
पंतप्रधानांवर टीका करायची नाही, दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी भाजपला घेरले असताना पंतप्रधान मुंबईत येत आहे.
वंदे मातरम रेल्वे हे फक्त निमित्त आहे. मुंबई पालिका त्यांना जिंकायची आहे. पंतप्रधान मोदींना मुंबई जिंकायची आहे, ठीक आहे त्यांची तयारी असेल तर आम्हीही तयार आहोत, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं. विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये भाजपला घेरले आहे.
राहुल गांधींनी मोजकेच आणि सोपे प्रश्न विचारले आहे, पण त्याचे उत्तर का देत नाही, असा सवालही राऊतांनी मोदींना केला.
काँग्रेसने आणीबाणी आणली होती, पण आता तुम्ही काय करत आहात. नेहमी नेहरू-गांधी घराण्याचा उल्लेख केला जातो. तुम्ही काय केलं तेही सांगा, असा सवालही राऊतांनी मोदींनी केला.