रवी राणा यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘हा’ उमेदवार भाजपमध्ये येणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- भारतीय जनता पार्टीचे रणजीत पाटील , काँग्रेसचे धीरज रामभाऊ लिंगाडे , वंचित बहुजन आघाडीचे अनिल ओमकार अमलकार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
भाजपचे रणजित पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघातील २३ उमेदवारांपैकी ९ उमेदवार आपल्या संपर्कात असून ते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. इतकेच नाही तर काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला तर तो ही भाजपमध्ये येण्यास तयार आहे असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे त्यामुळे अनेक जण आमच्या संपर्कात येत आहेत असेही ते म्हणाले.