ठाकरे गटा सोबतच्या युतीनंतर प्रकाश आंबेडकर यांची उद्या पहिली विराट सभा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरेगटासोबत युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर उद्या पहिली विराट सभा घेत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे. वंचित बहुजन आघाडीची पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात उद्या विराट सभा होतेय.
प्रकाश आंबेडकर या सभेला संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजता कोल्हेवाडीत जाहीर सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.