पुसद येथे 5 फेब्रुवारीला विदर्भस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा ; रावजी फिटनेसचा पुढाकार, मिस्टर वर्ल्ड अनुजकुमार तालियान यांची उपस्थिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील रावजी व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता अग्रवाल मंगल कार्यालयाच्या मैदानात भव्य विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील एक लाख रुपयांचे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ‘रावजी श्री – 2023’ बक्षीस प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला देण्यात येईल.
बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने व यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनच्या सहकार्याने विदर्भातील प्रथमच भव्य प्रमाणात या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक वजन गटात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
वजन गट 55 किलो पर्यंत,
वजन गट 55 ते 60 किलो पर्यंत,
वजन गट 60 ते 65 किलो पर्यंत,
वजन गट 65 ते 70 किलो पर्यंत,
वजनगट 70 ते 75 किलोपर्यंत,
वजन 75 ते 80 किलो पर्यंत,
वजनगट 80 व त्यापुढील असे एकूण सात वजन गटात प्रत्येकी अकरा हजार, नऊ हजार, सात हजार, पाच हजार, तीन हजार अशी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय बेस्ट मसल मॅन 21 हजार रुपये, बेस्ट पोजर 21 हजार रुपये, पुसद श्री 11 हजार रुपये अशी आकर्षक ट्रॉफीसह एकूण 39 बक्षिसे दिल्या जाणार आहेत.याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल,
सदर स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफ्यांची “विश्वनाथ सिंह नागरी सहकारी पतसंस्था, पुसद” यांची स्पॉन्सरशिप आहे.
मंडप व स्टेज साठी “गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी. नांदेड शाखा पुसद” ची स्पॉन्सरशीप आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त पैलवान यांनी सहभागी व्हावे तसेच जनतेनी उपस्थित राहावे अशी विनंती रावजी व्यायाम प्रसारक मंडळ पुसद चे अध्यक्ष वैभव गोविंदराव फुके, उपाध्यक्ष दिलीप राधेश्याम जांगीड,सदस्य प्रफुल्ल माधवराव फुके यांनी केली आहे.
अनुजकुमार तालियान स्पर्धेचे मुख्य आकर्षण
या विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे मिस्टर वर्ल्ड, मिस्टर इंडिया, उत्कृष्ट बॉडी बिल्डर अनुज कुमार तालियान मुख्य आकर्षण असून ते स्वतःआर्मी मॅन आहेत. त्यांचे अतिशय पिळदार शरीरसौष्ठव पाहण्यासाठी दर्शकांमध्ये उत्सुकता आहे. ते उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत. या स्पर्धेत विदर्भातील किमान दोनशे स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.