उद्गगम फाउंडेशनचा शेलु (बु) येथील महिलांसोबत आनंदाचा एक क्षण साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यातील शेलू (बु) येथे २६ जानेवारी २०२३ रोजी गावातील व बचत गटाच्या महिलांसोबत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदाचा एक क्षण साजरा करण्यात आला. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या..
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलींकडे कसे लक्ष द्यावे हे सौ सोनलताई ययाती नाईक ,सौ शामल सुनील गुद्धटवार ,सौ शुभा शशी चापके ,डाँ.सौ देविता रामचंद्र राठोड ,सौ पूजा शांतीसागर इंगोले या महिला सदस्यांनी नाटिकाच्या माध्यमातून सांगितले. तसेच नृत्य ,गायन व इतर कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात आले.. गावातील महिलांनी व शाळकरी मुलींनी या कार्यक्रमांमध्ये आपले कौशल्य सादर केले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा तथा उद्गगम फाउंडेशनच्या अध्यक्षा मा.सौ अनिताताई मनोहरराव नाईक होत्या..यावेळी सौ शुभांगीताई पानपट्टे ,सौ मंदाताई इंगोले ,सौ नलिनीताई व्यवहारे , सौ मंदाकीन्हीताई डूबेवार ,सौ सुनीताताई भोयर ,सौ जयाताई राठोड ,सौ किरणताई राठोड ,सौ रेवतीताई शर्मा ,सौ छायाताई राठोड ,सौ रश्मीताई राठोड ,सौ पूनमताई राठोड ,सौ रुपालीताई इंगोले ,सौ रंजनाताई चव्हाण ,प्रा.सौ दीपालीताई चव्हाण व इतर महिला उपस्थित होत्या.!