जिल्हा व सत्र न्यायालय पुसद येथे प्रजासत्ताक दिन साजरा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त न्यायमंदिर जिल्हा व सत्र न्यायालय पुसदच्या प्रांगणात प्रशासकीय जिल्हा न्यायाधिश वसंत.भा. कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी २१ अंमलदाराच्या पोलीस पथकाने व २१ एन.सी. सी कॅडेट च्या तुकडीने राष्ट्रीय सलामी दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात प्रशासकीय जिल्हा न्यायाधीश कुलकर्णी साहेब व त्यानंतर बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र ऑण्ड गोवा चे सन्माननीय सदस्य आशिषजी देशमुख साहेब यांचे संबोधन लाभले.वकील बार संघटन अध्यक्ष खराडे साहेबांना अतिशय सुंदर शब्दात प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले.
यावेळी बोलताना बार अध्यक्षांनी २६ जानेवारी १९५० रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं स्वतंत्र भारताचे स्वत:चे संविधान लागु झाले व खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता या दिवशी आपण स्थापन केली होती त्यामुळे हा दिन संविधानाचे महत्व अधोरेखित करतो असे सांगितले.
त्यावेळी न्यायाधिश कुलकर्णी यांनी गणतंत्र दिनाचे महत्व सांगितले. स्वतंत्र हे मोफत मिळाले नसून त्यासाठी अनेक जणांनी आपले सर्वस्व अर्पण केले, प्राणाची आहोती व बलिदान दिले तरी स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अश्या वीरांचे आपण स्मरण केले पाहिजे. हा देश अनेक वर्ष गुलामीत होता कारण आपल्या मधील एकता भंग झाली होती व आपण विखुरलेले होतो, आजही भारतात अनेक समस्या असतील परंतु आपण जेही कार्य करतो ते देश प्रेम मनात ठेवून करावे , राष्ट्र भक्ती मनात ठेवून कोणतेही कार्य केल्यास देशाची प्रगती निश्चित होईल व सगळ्यांनी एकोप्याने राहुन आपल्या मनामध्ये राष्ट्रिय भाव ठेवणे गरजेचे आहे. असा देशभक्ती चा संदेश यावेळी त्यांनी दिला.
कार्यक्रमात सर्व न्यायिक अधिकारी व बार संघाचे वकील, न्यायालय प्रबंधक वि. बंगाले, न्यायालयीन-प्रशासकीय कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते व २६ जानेवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला…