उद्धव ठाकरेंसाठी सेनेने बनवलेले खास पद, कोणी मांडलेला प्रस्ताव जाणून घ्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज कोणाची, धनुष्यबाणाचं चिन्ह कोणाचं यावरून वाद चाललेले असताना, आजपासून १० वर्षांपूर्वी उध्दव ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत एक पद निर्माण करण्यात आलं होतं.
तर शिवसेनाप्रमुख हे पदही गोठवण्यात आलं होतं. कोणी सुचवलं होतं हे पद? त्यामागची रंजक कहाणी काय आहे जाणून घेऊया.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर २०१२ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जयंतीला २०१३ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या अध्यक्षपदी औपचारीक निवड करण्यात आली होती. त्याशिवाय आदित्य ठाकरेंनाही सिवसेनेत नेतेपद देण्यात आले.
शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. मुबईच्या शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारीणीत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
कोणी मांडला प्रस्ताव?
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव सर्वप्रथम गजानन किर्तीकर यांनी मांडला होता. त्याला दिवाकर रावतेंनी अनुमोदन दिलं होतं. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याचवेळी शिवसेना प्रमुख पद गोठवण्यात आलं होतं. शिवाय कार्याध्यक्ष हे पद रद्द करण्यात आलं. याव्ळी शिवसेना प्रमुख हे केवळ बाळासाहेब ठाकरेच होते, दुसरा कोणी त्यापदावर बसू शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्यात आलं होतं.