अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसाचे झळकले पोस्टर; फडणवीस म्हणाले, “त्यावर.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्त मालाडमध्ये छोटा राजनचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. हे पोस्टर समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
ही माहिती मिळताच पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहेत.
शुक्रवारी ( १३ जानेवारी ) छोटा राजनचा वाढदिवस पार पडला. त्यानिमित्त मालाड पूर्व मधील गणेश मैदान तानाजी नगर, कुरार व्हिलेज येथे छोट्या राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. १४ आणि १५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी परिसरात एक पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यावर छोटा राजनला ‘आधारस्तंभ’ दाखवण्यात आलं आहे.
सीआर सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हे पोस्टर लावले आहेत. पोस्टर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी सहा जणांनी ताब्यात घेतलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जरूर यावर कारवाई होईल,” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.