कोरोना रूग्णवाढीत WHO कडून मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढत्या रूग्णसंख्येत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
WHO च्या या घोषणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, कोरोना महामारीपूर्वी अस्तित्वात आलेल्या इबोला विषाणुचा उद्रेक संपुष्टात आल्याची घोषणा WHO कडून बुधवारी करण्यात आली आहे.
सलग 42 दिवस या विषाणुची लागण झालेल्या एकाही नव्या रूग्णाची नोंद न झाल्याने या विषाणुचा प्रसार संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. या विषाणुचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत युगांडात 55 लोकांचा बळी गेला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या रोगाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इबोलाचा प्रादुर्भाव यशस्वीरित्या नियंत्रित करण्यात यश आल्याचे युगांडाचे आरोग्य मंत्री जेन रुथ एसेंग यांनी सांगितले.
युगांडात इबोलाचे आतापर्यंत एकूण 142 बाधितांची पुष्टी करण्यात आली आहे तर, यामुळे 55 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 87 रुग्णांनी या विषाणुवर यशस्वीरित्या मात केल्याचे WHO ने म्हटले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….