अपघातानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आज सकाळी.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांना रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले. यानंतर बच्चू कडूंनी बुधवारी (११ जानेवारी) ट्वीट केलं आणि अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली.
बच्चू कडू ट्वीटमध्ये म्हणाले, “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.”

नेमकं काय घडलं?
बुधवारी (११ जानेवारी) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
काही दिवसांपासून आमदारांच्या अपघाताची मालिका
दरम्यान, एक महिन्यांच्या कार्यकाळात राज्यातील तीन आमदारांच्या कारचा अपघात झाला आहे. २४ डिसेंबरला भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली. या अपघातात गोरे आणि त्यांचे सहकारी जखमी झाले होते.
४ जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांना मुक्का मार लागला आहे. सुदैवाने मुंडे या अपघातातून बचावले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी कशेडी घाटात अपघात झाला होता. त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती. मात्र, अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नव्हती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….