गृहमंत्री अमित शाह यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लॅंडिंग ; नेमकं कारण आलं समोर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या विमानाचं बुधवारी रात्री गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. गुवाहाटीच्या लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे लँडिंग करण्यात आलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगरतळा येथे जात होते. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या विमानाचं गुवाहाटीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ते आजची रात्र गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे राहणार आहेत. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आगरतळा दौऱ्यावर जात आहेत. भाजपाने त्रिपुरात रथयात्रेचं आयोजन केलं आहे. याच रथयात्रेचं उद्घाटन करण्यासाठी अमित शाह गुरुवारी सकाळी आगरतळाला रवाना होणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..