काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना हॉस्पिटलमध्ये केले दाखल……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी सोनिया यांच्यासोबत मुलगी प्रियांका गांधी वढ्रादेखील उपस्थित असून, सोनिया गांधींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे, तर, पीटीआयच्या सूत्रांनी सोनिया गांधींना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.
सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील बागपत येथील मावी कलान येथून सकाळी सहा वाजता सुरू झाली. मात्र, यात प्रियांका गांधी यात सहभागी झाल्या नाहीत. दुपारनंतर त्या भारत जोडोत सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
24 डिसेंबर रोजी सोनिया गांधी दिल्लीतील भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींसोबत थोडे अंतर पायी चालत गेल्या होत्या. याआधी सोनिया गांधी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकात भारत जोडोत सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोविडची लागण झाल्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..