२०२४ मध्ये तुम्ही पण जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा ; शिंदे गटाला राऊतांचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन आपल्यासोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य सकारात्मक आहे. आमची इच्छा होती शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र यावी. देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ता उलथवायची असेल तर या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे, असंही राऊत यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचे राऊत यांनी नमूद केलं.
ज्यांच्यामागे बहुसंख्य दलित आणि वंचित समाज आहे, असे प्रकाश आंबेडकर आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत आहे. यावेळी दीपक केसरकर यांनी केलेल्या टीकेवर राऊत म्हणाले की, पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही किंवा कायदा नाही. केसरकर खरचं असं बोलले असतील तर त्यांनी देखील २०२४ मध्ये कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..