वंचित-एमआयएम ही नैसर्गिक युती, प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असते तर किंग झाले असते…! ; इम्तियाज जलील यांचं विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम-वंचित आघाडीवर भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमची युती ही लोकांची युती होती.
आंबेडकर आमच्यासोबत राहिले असते तर ते किंग किंवा किंगमेकर झाले असते. पण ते सोबत राहिले नाहीत याचं आम्हाला दु:ख वाटते. बाळासाहेबांचे कुठेतरी चुकले असणार त्यामुळे हे घडू शकले नाही. वंचित आणि एमआयएम ही नैसर्गिक युती होती, असं जलील म्हणालेत.
जलील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. त्यांच्या समाजाचे नेते व्हावे.पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये आता फक्त जा म्हणून सांगायचं बाकी राहिलं आहे. पंकजा मुंडे जर बाहेर पडल्या तर राज्यातले सगळे मोठे नेते पंकजा मुंडे यांच्यासोबत येतील. सध्या भाजप पंकजा मुंडे यांना रबरी शिक्का म्हणून वापरत आहे, असंही जलील म्हणालेत.
पंकजा मुंडे यांनी बाहेर पडावं. आम्हाला सोबत घ्यावं आणि पाहावं महाराष्ट्रात काय परिवर्तन होतं ते, असंही जलील म्हणालेत.
मोदी है तो मुंकिन है म्हणता तर मग अडाणी आणि टाटा यांच्यात असं काय आहे की त्यांना जमतं आणि मोदींना जमत नाही, असा सवाल जलील यांनी विचारला आहे.
औरंगाबाद महापालिकेत कंत्राटी कामगारांच्या नावाखाली ठेकेदार महापालिकेतील तीन अधिकारी आणि 2 आमदार आणि एक मंत्री घोटाळा करत आहेत. महापालिका दरमहिना साडेतीन कोटी रुपये पगारासाठी देते. पण ठेकेदार फक्त अडीच कोटी पगार करतो आणि बाकीचे पैसे अधिकारी आणि नेत्यांमध्ये वाटप होतात, म्हणून मी 6 तारखेला मोर्चा काढत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मी सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांना खुलं चॅलेंज करतो. जर मी मॅनेज केल्याचा खोटा आरोप करत असेन तर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा, असं ओपन चॅलेंज जलील यांनी दिलंय.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..