शिक्षक मतदारसंघ ; प्रमुख नेत्यांशी फडणवीस यांच्या बैठकीनंतर भाजप उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या धर्तीवर मंगळवारी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही निवडक उमेदवारांसोबत बैठक घेतली.
यावेळी इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
भाजप मधून यावेळी नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर आणि माजी महापौर व शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे यांनीही भाजपकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांनी बैठकीला हजेरी लावल्याचे माहिती आहे. गाणार यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने भाजपशी सल्लामसलत न करता यापूर्वीच जाहीर केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर कुणाला भाजप शिक्षक मतदारसंघात कुणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..