संगीत विश्वाला मोठा धक्का ; प्रसिद्ध गायिकेचं निधन ; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वर्षाच्या सुरुवातीला संगीत विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी सुमित्रा सेन यांना अखेरचा श्वास घेतला.
सुमित्रा सेन यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी श्राबनी सेन यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली. फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आईच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आई आज भोरमध्ये आम्हाला सोडून गेली…’ अशी पोस्ट श्राबनी सेन यांनी केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. म्हणून त्यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचं निदान झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांनंतर त्यांची प्रकृती खालावली, अखेर ३ जानेवारीला पहाटे सुमित्रा सेन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संगित विश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सुमित्रा सेन यांची मुलगी श्राबनी सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धापकाळाच्या समस्यांनी त्या त्रस्त होत्या. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सुमित्रा सेन यांना घरी आणण्यात आलं. घरी आल्यानंतर नव्या वर्षी सुमित्रा यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुमित्रा सेन यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सुमित्रा सेन यांच्या निधनामुळे संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..